Fusion Microfinance IPO: IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला, 4 नोव्हेंबरपर्यंत करता येणार गुंतवणूक ,जाणून घ्या

By | November 2, 2022

Fusion Microfinance IPO: फ्युजन मायक्रोफायनान्सचा आयपीओ आज गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. DCX Systems नंतर या आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी उघडणारा हा दुसरा IPO आहे. फ्युजन मायक्रोफायनान्सची गुंतवणूक ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी कंपनी वॉरबर्ग पिंकसने केली आहे. हा IPO 4 नोव्हेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार  आहे.

फ्यूजन मायक्रोफायनान्स आयपीओच्या प्राइस बँडबद्दल बोलायचे झाले तर ते 350 ते 368 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले आहे. यामध्ये 13,695,466 इक्विटी स्टॉक्स विक्रीसाठी देण्यात आले आहेत. या IPO चे शेअर्स 15 नोव्हेंबरला BSE आणि NSE वर लिस्ट केले जाऊ शकतात.

गुंतवणूकदार किमान 40 समभागांसाठी आणि 40 च्या पटीत बोली लावू शकतात. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना प्रत्येक लॉटमध्ये किमान 14,720 रुपये गुंतवावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *