PM Kisan Yojna : शेतकऱ्यांनच्या हितासाठी शेतकऱ्यांनाआर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार कडून अनेक योजना राबवल्या जातात या योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली जाते . पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojna) हि देखील अशीच आहे . या योजनेतून सरकार दरवर्षी शेतकर्यानच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात . ही रक्कम 2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. नुकताच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा हप्ता दिवाळी भेट म्हणून देण्यात आला आहे .
पीएम किसान योजनेची पात्रता काय आहे, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या गरीब घटकांना दिला जातो. या योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी.
यासोबतच शेतकरी कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. आयकर रिटर्न भरणारी व्यक्तीही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
पीएम किसान योजना आणि त्याचे नियम या योजनेच्या नियमांनुसार एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीचा वापर शेतीच्या कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी केल्यास किंवा एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या शेतात भाड्याने शेती केल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. सोबतच जर एखादा शेतकरी असेल ज्याची स्वतःची जमीन असेल पण ती त्याच्या नावावर नसून वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 17 ऑक्टोबर रोजी 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली. दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली होती. त्यांच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेअर केले होते.