बँक म्हणजे काय ? (What is a bank?)

By | September 9, 2022

 

बँकव्यवसाय हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. जसजसा जगात सामाजिक व आर्थिक बदल होत गेला तसतसा बँकांच्या कार्यपद्धतीत बदल होत गेला. Bank हा इंग्रजी शब्द Bancus, Banque, Banc किंवा Banco या इटालियन शब्दांपासून अस्तित्वात आलेला आहे. या सर्व शब्दांचा अर्थ म्हणजे बसण्याचा बाक होय. इटलीमध्ये ज्यू लोक पूर्वी लोंबार्डी शहरात रस्त्यावरील बाकांवर बसून पैसे कर्जाऊ देत असत व नाण्यांची अदलाबदल करून देत असत आधुनिक बँकादेखील अशाच प्रकारचे व्यवहार करतात म्हणून ‘Banco’ या शब्दावरून ‘बँक’

(Bank) हा शब्द अस्तित्वात आला आहे.

विविध तज्ज्ञांनी केलेल्या बँकेच्या व्याख्या : विविध अर्थतज्ज्ञांनी बँकेची व्याख्या आपापल्या विचारानुसार करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यांनी केलेल्या व्याख्यांमध्ये विविधता दिसून येते. काही प्रमुख अर्थतज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे : व्याख्या

“गिन्हाइकांच्या चालू खात्यावर सोडलेले चेक जो वटवितो आणि जो आपल्या रोजच्या व्यवहारात लोकांकडून चालू ठेवीरूपाने पैसा जमा करतो व त्यांना हे पैसे चेकद्वारा काढण्यास परवानगी देतो तो बँकर होय. ” डॉ. हर्बर्ट एल्. हार्ट

“जो ठेवी व चालू ठेवी स्वीकारीत नाही, चेक देत नाही किंवा चेक वटवित नाही, गि-हाइकासाठी चेक वटवित नाही, तो बँकर होऊ शकत नाही. बँकरने आपण बँकर असल्याचे दर्शविले पाहिजे. बँकिंग हा त्याचा मुख्य व्यवसाय असला पाहिजे व त्यापासून त्याचा चरितार्थ चालत असला पाहिजे.”

• सर जॉन पेगेट “ज्या संस्थेजवळ लोक आपल्याजवळील अनावश्यक पैसा जमा करतात आणि जी संस्था कर्जदाराच्या फेडीची क्षमता लक्षात घेऊन गरजू व्यक्तींना रकमा ‘उधार’ देते, त्या संस्थेला ‘बँक’ असे म्हणतात.’ “

“जी संस्था विनियोग आणि बचती गोळा करणान्या दलालाचे काम करते आणि तिथा उपयोग विनिमय- माध्यमासाठी करते, तिला ‘बैंक’ म्हणतात.’ टॉसिंग “मागणी करताच विनिमय पत्राद्वारे काढता येणान्या जनतेच्या ठेवी स्वीकारणारी व्यक्ती

अथवा संस्था म्हणजे बँक’ होय.”

“जी संस्था कर्जे देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून ताबडतोब किंवा मुनीप्रमाणे परत करण्यासाठी स्वीकारले व या देवी चेक्स ड्राफ्ट्स या अन्य प्रकारे सोय करते, ती संस्था म्हणजे ‘बैंक’ होय.”

1949 चा बँकिंग कंपनी कायदा

व्यक्तींच्या परस्पुर

शोधनात

• प्रा. सेयर्स

“बँक ही अशी संस्था आहे की, जिच्या यंत्रणांना दुसन्या

विस्तृत मान्यता प्राप्त झालेली आहे. “

इंग्लिश कायद्यामध्ये बँकेची व्याख्याच करण्यात आलेली नाही. मात्र, त्यात अशी तरतूद आलेली आहे की, “एखादी संस्था बँक आहे अथवा नाही या प्रश्नावर निर्णय देण्याची जेव्हा पाळी येईल तेव्हा या प्रश्नाचा निर्णय देताना त्या वेळची रूढ कल्पना, रीतिरिवाज अथवा कार्यपद्धती यांच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा. या कायद्यात बँकेच्या कर्तव्याचा उल्लेख आढळतो. तसेच बँकिंग व्यवसायाचा दुरुपयोग करणान्यावर कायदेशीर इलाज करण्याची तरतूद इंग्लिश कायद्यात आहे. अमेरिकेमध्ये बँकिंगची व्याख्या न देता फक्त वर्णनात्मक स्वरूपाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “बँकिंग म्हणजे कर्ज व पत यासंबंधीचा व्यवसाय होय. “

वरील सर्व व्याख्यांचा विचार केला असता असे दिसून येते की, प्रत्येक व्याख्येमध्ये बँकेच्या एखाद्-दुसऱ्या कार्याचा समावेश केलेला आहे. बँकेच्या कार्यात परिस्थितीनुसार खूप विविधता आलेली आहे. म्हणूनच ‘बँकेची कार्ये करणारी संस्था म्हणजे बँक’ अशी व्याख्या केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *