भारतातील बँकांची रचना (Structure of Banks in India)

By | September 9, 2022
Structure of Banks in India

Structure of Banks in India

 

Structure of Banks in India: भारतीय बँकांच्या रचनेवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची मध्यवर्ती बँक असल्याने ती वरील रचनेत सर्वोच्च स्थानी असल्याचे दिसून येते.

मध्यवर्ती बँक : देशातील बँकव्यवसायाचा केंद्रबिंदू म्हणजे मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक इतर बँकांप्रमाणे आर्थिक उद्दिष्टातून स्थापन झालेली नसते. व्यापारी बँकांपेक्षा या बँकेचे कार्य भिन्न स्वरूपाचे असते.

सरकारचे आर्थिक धोरण यशस्वी करणे व देशातील बँकांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करते. पहिली मध्यवर्ती बँक भारतात 1935 साली ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ या नावाने स्थापन झाली. सरकारची बँक व बँकांची अशी दुहेरी भूमिका ही बँक बजावीत असते. याशिवाय नोटा छापणे, पतनियंत्रण करणे, विदेशी विनिमयाचे नियंत्रण करणे ही कार्ये मध्यवर्ती बँक करते. एका देशात एकच मध्यवर्ती बँक असते पण तिच्या शाखा मात्र अनेक असतात. बहुधा ही बँक सरकारच्या मालकीची असते किंवा सरकारचे तिच्यावर नियंत्रण असते. कारण सरकारला देशातील आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवून आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालविण्याची जबाबदारी असते.

सूचित बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट, 1934 च्या दुसन्या सूचीमध्ये ज्या बँका समाविष्ट केल्या जातात त्या बँकांना ‘सूचित’ किंवा ‘निर्देशित बँका’ असे म्हणतात.

 

सूचित व्यापारी बँका

(1) सार्वजनिक क्षेत्रातील बँका : ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन शासनाकडून केले जाते त्या बँकांना ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँका’ असे म्हणतात. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्याशी संलग्न सात बँका, 1969 साली राष्ट्रीयीकरण करण्यात आलेल्या चौदा प्रमुख व्यापारी बँका व 1980 साली राष्ट्रीयीकरण करण्यात आलेल्या सहा व्यापारी बँकाचा समावेश केला जातो. सन 1955 मध्ये इम्पिरिअल बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वांत मोठी व्यापारी बँक असून ती रिझर्व्ह बँकेची दुय्यम बँक म्हणून कार्य करते. या बँकेला सात बँका संलग्न बँका म्हणून जोडण्यात आल्या. पुढे सन 1969 मध्ये ज्या चौदा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले व त्यानंतर 1980 साली आणखी सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले, या सर्व बँकांचा सूचित व्यापारी बँकांमध्ये समावेश होतो.

(2) खासगी क्षेत्रातील बँका खासगी क्षेत्रातील बँका म्हणजे संयुक्त भांडवली का, या बँकांची मालकी खासगी स्वरूपाची असते. भारताच्या बँम्पवसायातील खासगी क्षेत्रात तेवीस जुन्या आणि आठ नव्या पिढीतील बँका आहेत…

(3) भारतातील विदेशी बँका ज्या बँकांचे मुख्य कार्यालय विदेशात आणि त्यांच्या शाखा भारतात आहेत अशा बँकांना ‘विदेशी बँका’ किंवा ‘विदेश विनिमय बँका’ असे म्हणतात. या बँका व्यापारी बँकांप्रमाणेच कार्ये करतात, ग्राहकांना दर्जेदार सेवा देतात, भारताच्या विदेशी व्यापाराला वित्तपुरवठा करतात. या बँकांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास उत्तेजन मिळते.

(4) प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण पतपाहणी समिती व परीक्षण समिती तसेच नियुक्त समित्यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तसेच शेती व त्यावर आधारित कुटीरोद्योगांचा विकास करण्यासाठी योग्य वेळी आवश्यक तेवढा पतपुरवठा होणे आवश्यक आहे, असे निष्कर्ष काढले होते. या निष्कर्षास अनुसरून केंद्रशासनाने 2 ऑक्टोबर, 1975 रोजी महात्मा गांधींच्या जयंती दिनी उत्तर प्रदेशात दोन, हरियाणात एक, राजस्थानमध्ये एक व पश्चिम बंगालमध्ये एक अशा पाच ग्रामीण बँकांची स्थापना केली.

प्रवेशाचा विकास करण्यासाठी या बँकांनी खेडे दत्तक योजना राबविली आहे.

 

सूचित सहकारी बँका 

(1) नागरी सहकारी बँका नागरी भागातील लहान व्यावसायिक, मध्यमवर्गीय पगारवार व्यक्ती व व्यापारी यांची कर्जाची गरज भागविण्यासाठी शहरी भागात नागरी सहकारी बँकांची स्थापना 1904 च्या सहकारी कायद्यानुसार केली जाते. मात्र, या बँकांची संख्या मर्यादित आहे.

(2) राज्य सहकारी बँका : भारतातील शेतकन्यांची कर्जाची गरज भागविण्यासाठी सन 1904 च्या सहकार कायद्यानुसार सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे. गावपातळीवर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *