Will it rain tomorrow?: उद्या पाऊस पडेल का ? याची चिंता सर्वाना आहे , गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, आता मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा राज्यात सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy rain) बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाचे (Indian Meteorological Department) वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, “येत्या 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसासह काही ठिकाणी अतीवृष्टीचे इशारे. पुढचे 2, 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय.”