मुंबई : आंबा हा फळांचा राजा आहे, जो उन्हाळात येतो आणि पुढचे काही महिने तो खाण्यासाठी आपल्याला उपलब्ध असतो. असे बरेच कमी लोक असतील, ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. परंतु आंबा म्हटलं की, बऱ्याच लोकांचं मन हे आपोआप त्याच्याकडे खेचलं जातं. आंबा हा खायला रसाळ आणि गोड लागतो आणि त्याची चव एकदा का आपल्या जिभेला लागली की, संपलंच… आपलं पोट भरलं तरी आपलं मन काय आंब्यावरुन उडणार नाही.
1. गोड आंबे खरेदी करण्यासाठी महत्वाची टीप
गोड आंबा खरेदी करण्यासाठी, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, जेव्हाही तुम्ही आंबा खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगापेक्षा त्याच्या सालीचा जास्त विचार करा. आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकलेला असेल त्याच्या सालीवर एक डागही पडत नाही, तर केमिकल टाकून पिकवलेल्या आंब्यावर डाग दिसू लागतात.
2. गोड आंबे खरेदी करण्यासाठी इतर टिपा
गोड आंबा घ्यायचा असेल, तर त्याला दाबून त्याचा वास घ्या. आंब्याचा सुगंध एकदम स्ट्राँग येत असेल, तर समजून घ्या की, तो नैसर्गिकरित्या पिकलेला आणि गोड आहे. आंब्यापासून अल्कोहोल किंवा रसायनाचा वास येत असेल, तर असा आंबा चुकूनही खरेदी करू नका, कारण असा आंबा खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकतात आणि असे आंबे गोड नसतात.
3. आंबा खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा
अनेक वेळा वरून पिकलेला आंबा आतून कच्चा असतो. त्यामुळे थोडा दाबून आंबा खरेदी करा. परंतु जास्त पिकलेले आंबे खरेदी करू नका कारण ते आतून कुजलेले असू शकतात.
उन्हाळ्यात आंबा खाण्याचे फायदे जाणून घ्या
– कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त
– चांगली दृष्टी होते
– कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त
– त्वचेसाठी फायदेशीर
– पचन सुधारण्यास उपयुक्त
– रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
– उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत