अल्पविकसित अर्थव्यवस्था – Underdeveloped economy

By | January 7, 2022

 

आर्थिक विकासाच्या संदर्भात जगातील देशांची विभागणी अल्पविकसित विकसनशील आणि विकसित देश अशा तीन गटात केली जाते. सध्याच्या काळात अल्पविकसित अर्थव्यवस्था या विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जातात.

विकसनशील देश म्हणजे असे देश की ज्या देशांकडे भांडवल व मानवी साधन संपत्ती याचा अधिक प्रमाणात वापर करण्याची व देशाच्या लोकसंख्येला उच्च पातळीवरचे राहणीमान प्राप्त करून देण्याची क्षमता असते

विकसनशील देश आणि अविकसित देश असे असतात की जे लोक संख्या आणि नैसर्गिक साधन समग्री च्या तुलनेमध्ये भांडवली साधनांच्या बाबतीत विकसित देशांच्या मानाने कमी पडत असतात।

अल्प विकसित आणि विकसनशील देशांच्या व्याख्यान वरून असे म्हणता येते की विकसनशील देशात मानवी श्रम व नैसर्गिक साधन सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते मात्र भांडवलाच्या टंचाईमुळे ही साधनसामग्री पूर्णपणे वापरली जात नाही अल्पविकसित किंवा विकसनशील देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न कमी असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *