विश्व के प्रमुख औद्योगिक क्षेत्र
शिकागो
शिकागो अमेरिकेच्या इलिनॉय राज्यामधील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसर्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लेक मिशिगनच्या किनारी वसलेल्या या शहराची वस्ती सुमारे २७ लाख आहे. शिकागो महानगराची वस्ती अंदाजे ९७, ००, ००० असून ही लोकसंख्या इलिनॉय, विस्कॉन्सिन व इंडियाना राज्यांमध्ये पसरलेली आहे.
न्युईंग्लेण्ड
न्यू इंग्लंड हा अमेरिकेतील अति-ईशान्येकडील एक भौगोलिक प्रदेश आहे. न्यू इंग्लंड प्रदेशात सध्याची मॅसेच्युसेट्स, मेन, व्हरमॉंट, न्यू हॅम्पशायर, कनेक्टिकट व र्होड आयलंड ही राज्ये येतात. न्यू इंग्लंड ही अमेरिकेतील ब्रिटिशांची सर्वात जुनी वसाहत आहे. ब्रिटिश खलाशी येथे १६२० सालापासुन वसले आहेत.
हेम्पशायर
हँपशायर ही इंग्लंडमधील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. सुमारे १७.७ लाख लोकसंख्या असलेली हँपशायर ही इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येची काउंटी आहे. साउथहँप्टन व पोर्टस्मथ ही ब्रिटनमधील दोन मोठी शहरे ह्याच काउंटीचा भाग आहेत.
लंकाशायर
लँकेशायर ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस कंब्रिया, ईशान्येस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस वेस्ट यॉर्कशायर, दक्षिणेस ग्रेटर मँचेस्टर व नैर्ऋत्येस मर्सीसाइड ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहे.